पाणी निसर्गाने आम्हाला दिलेली एक अमूल्य देन आहे. त्यामुळे पाणी वाचविणे हे आपले कर्तव्यच आहे असे समजून आपण पाणी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. पाणी कसे वाचविता येईल याचे काही घरगुती मार्ग येथे देत आहे आवडले तर अवश्य कळवा.
१) घरातील नळ जर लिक होत असेल तर ताबडतोब प्लंबर ला बोलावून दुरुस्त करून घ्यावा. नळातून थेंब थेंब पाणी गालात असते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण थेंबे थेंबे तळे साचे हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेले सुविचार विसरून चालणार नाही पाणी वाचवा जीवन वाचवा!
२) पिण्यासाठी साठविलेले पाणी दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नये. त्याचा उपयोग आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी, कुंडीतील झाडांसाठी किंवा बागेतील झाडांसाठी करावा पाणी वाचवा जीवन वाचवा!
३) दंत स्वच्छता करतांना बेसिन चा नाला सतत चालू ठेऊ नये। त्यापेक्षा जुन्या पध्दती प्रमाणे तांब्यात पाणी घेऊन दंत स्वच्छता करणे उत्तम पाणी वाचवा जीवन वाचवा!
४) आपल्याकडील दुचाकी, तीन चाकी किंवा चार चाकी वाहने धुण्यासाठी कमीत कमी पाणी खर्ची कसे होईल ते पाहावे, जसे ओल्या कापडाने गाडी स्वच्छ करून घेता येते पाणी वाचवा जीवन वाचवा!
५) उन्हाळ्या मध्ये आपण फ्रीज मध्ये ठेवलेल्या बाटलीतील पाणी पितो. बाटली तोंडाला लावून पिले तर गरजे पुरतेच पाणी आपण पितो आणि पुन्हा बाटली फ्रीज मध्ये ठेऊन देतो।हीच पद्दत आपण फिल्टर मधून ग्लास मध्ये पाणी घेऊन पितांना वापरावी. गरजे पुरतेच पाणी ग्लास मध्ये घ्यावे म्हणजे शिल्लक पाणी फेकले जाणार नाही पाणी वाचवा जीवन वाचवा!
६) आपला बंगला असेल तर पाण्याच्या टाकीतील पाणी टाकी पूर्ण भरल्या नंतर वाहू नये याची काळजी घ्यायला हवी। किंवा टाकीतील नळाला फ्लोट वळव बसवून घ्यावा म्हणजे टाकी भरल्यावर नळ आपोआप बंद होऊन जातो. जर सहकारी सोसायटी असेल तर तेथे सुद्धा अशीच काळजी घ्यायला हवी पाणी वाचवा जीवन वाचवा!
७) उगाच रस्त्यावर पाणी सिंपडू नये। सिंपडायचेच असेल तर हाताने शिंपडावे याने पाणी कमी लागते व चिखल होत नाही. पाईपचा वापर करू नये पाणी वाचवा जीवन वाचवा!
८) शक्य असल्यास भांडी नळाखाली न धुता बादलीत पाणी घेऊन धुवावी पाणी वाचवा जीवन वाचवा!
९) कपडे धुणे झाल्यावर राहिलेल्या साबणाच्या पाण्याचा उपयोग टोयलेट स्वच करण्यासाठी किंवा अंगणात सदा सिंपडण्यासाठी करावा पाणी वाचवा जीवन वाचवा!
मला वाटते इतके जरी आपण भगिनींनी केले तरी बऱ्याच प्रमाणात पाण्याची बचत साद्ध्य होईलपाणी वाचवा जीवन वाचवा!
Tuesday, December 29, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
Good Observations to follow
ReplyDeleteचांगल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!
ReplyDeleteक्रुपया शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.
ReplyDeleteहोय, त्याबद्दल मला माफ करावे.
ReplyDeleteया अगोदर आपला गैसची बचत असा लेख वाचला होता... आनी आज बऱ्याच दिवसानंतर हा लेख वाचतो आहे...
ReplyDeleteवाचून जागरुक होत आहे मी.
आंघोळ करताना अनावश्यक जास्त पानी वापरू नये हे विसरलेले दिसते आहे....