Monday, December 28, 2009
गैस चा वापर जपून करणे - एक सल्ला
१. शेगडीवर भांड ठेवल्यावरच गैस सुरु करावा. याने गैस ची बचत होते.
२. भाजण्यासाठी गैसच्या जाळीचा उपयोग केल्यास गैस कमी खर्ची पडतो.
३. गैस संपला असेल तेव्हा सिलिंडर आडवा करून वापर करू नका. कधी कधी स्फोट होतो.
४. गैस कमी निघत आहे असे वाटत असेल तर गैसच्या ब्रश चा वापर करून स्वच्छ करून घ्यावे. छिद्रातील घाण निघाल्यावर जास्त व निघतो.
५. अधून मधून छिद्र स्वच्छ करत राहावे.
६. दुध किंवा इतर पदार्थ उतू जाऊ देऊ नये. याने छिद्र बुजून जातात व गैस कमी निघतो.
७. पाणी तापविण्यासाठी पातेल्याचा वापर करण्यापेक्षा गैसच्या गीजर चा वापर करावा. याने गैस ची बचत होते.
८. विजेचे गीजर वापरू नये. त्यापेक्षा पातेल्यात पाणी गरम करणे जास्त चांगले.
९. रोज रात्री न विसरता गैस बंद करायला विसरू नये.
१०. घरातून बाहेर पडतांना किंवा गावी जातांना गैस बंद करणे किंवा रेग्युलेटर काढून ठेवणे जास्त सुरक्षित असते.
११.गैस सिलिंडर प्रवाशी वाहतुकीतून नेऊ नये.
१२. गैस जपून वापरला तर ह्या चित्रातील लाईन पासून आपण वाचू शकतो हे लक्षात असू द्यावे.
तुमच्या घरात वापरत असलेला गैस कसा काम करतो याची थोडक्यात माहिती या यु ट्यूब वर सापडलेल्या व्हीडीओ मध्ये दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हा पक्क्या ग्रुहिणीचा ब्लाग आहे हे सहज ध्यानी येते..
ReplyDeleteसल्ला नं ९ आम्ही काटेकोर पणे पाळत होतो... बाकीचे बरेच सल्ले नविनच आहेत..त्यांचीही अंमल्बजावनी करन्याच्या सुचना गृहमंत्र्यांना देवून टाकतो... धन्यवाद बरका.
अवश्य. ओळखल्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteसूचना मनोमन पटल्या. तुम्हाला लेखनासाठ शुभेच्छा. माझ्या ब्लॉगचं विजेट आपल्या ब्लॉगवर लावल्याबद्दल आभारी आहे. आपल्याही ब्लॉगचं विजेट लवकर बनवा. माझ्या ब्लॉगच्या विजेटमधे एक त्रुटी होती, ती दुरूस्त केली आहे. माझ्या ब्लॉगला अपर्णाच्या ब्लॉगची लिंक येते आहे. आपल्या ब्लॉगवर ते विजेट सुधारून घ्याल का?
ReplyDeleteधन्यवाद कांचन, आणि विजेटची सुधारणा करून घेते.
ReplyDelete