इन्स्टट पुरणपोळी
गम्मत वाटली न नाव वाचून. पण आज असेच झाले. स्वयंपाक काय करावा असा विचार करत किचन मध्ये शिरले आणि आमचे कन्यारत्न पाठीमागे येऊन धडकले.
"अग आई मला न कि पुरणपोळी खायची इच्छा होत आहे.बनवशील का?" -------इति कन्या.
" ठीक आहे विचार करते." मी.
मी तिला आश्वासन दिले पण लगेच कसे पूर्ण करावे काही सुचेना. अचानक ट्यूब पेताल्यासारके झाले म्हणजे डोक्यात प्रक्ष पडला आणि "इन्स्टट पुरणपोळी" तयार करायचा मार्ग सापडला.
मी लगेच बेसनाचे पीठ सॉरी म्हणजे चना डाळीचे पीठ म्हणजे बेसन घेतले. आणि ते भिजवून साखरेचा पाक वेलची ई. घालून पुरण तयार केले. आणि लगेच पुरणाच्या पोळ्या तयार.
कन्येने ह्यांना पुरण पोळी खायला यां म्हणून निमंत्रण दिले. तर त्यांचा विश्वास बसत नव्हता.
चार वेळा सांगितले कि पुरणपोळी तयार केली आहे. पण त्यांनी ऐकलेच नाही. म्हणाले "कसे शक्य आहे?"
मुलीने पोळी नेऊन दाखविली तरी ही ती पुरणपोळीचा नाही असे म्हणाले.
मग मी त्यांना शपथेवर सांगितले तेव्हा जेवण करायला आले. आणि पुरण पोळीवर ताव मारला.
बेसनाची पुरणपोळी तयार केली हे सांगितल्यावर त्यांना खरेच वाटले नाही.
आपण ही करून पाहायला हरकत नाही