Saturday, May 22, 2010

अन-मोल जीवन


खरोखर जीवन हे अनमोल आहे. परमेश्वराने मानवाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. पण मानव जस् जशी प्रगती करीत आहे तस तशी ह्या अनमोल मानवाचे जीवन अन-मोल होत चालले आहे. आता मानवाच्या जीवन खूप स्वस्त झाले आहे. थोड्याश्या पैश्यांसाठी एक दुसऱ्याचा जीव सहजतेने घेतला जातो.

आज मेंगलोर ला विमान अपघात झाला. बिचारे १५८ प्रवाशी विनाकारण क्षणात या जगातून नाहीसे झाले. आता ब्लेक बॉक्सची (अनिष्पन्न) तपासणी होणार. ( मी येथे अनिष्पन्न शब्द सहेतुक वापरला आहे. कारण अपघात का झाला फक्त हेच आपण जनतेला माहिती व्हावे म्हणून तपास करीत असतो. म्हणजे फक्त फोर्मेलीटी हो! करणे शोधून पुढे असे होऊ नये या साठी आपण प्रयत्नच करीत नाही.)

बातम्या बघितल्या ऐकल्या आणि मला धक्काच बसला. ते विमानतळ व धावपट्टी चक्क एका डोंगरावर आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला चक्क दरी आहे. इतकेच नाही तर जेथे धावपट्टी संपते तेथे ही दरी होती. मला प्रश्न पडला की ज्या कोणी हे विमानतळ बांधण्यासाठी टी जागा निवडली असेल त्याने त्यावेळी असा अपघात होईल अशी कल्पना केली नसेल का? नसेल ही! कारण असा विचार करणे म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग समजले जाते. कदाचित ते विमानतळ बांधणाराने लहान विमानासाठी ते बांधले असेल. आणि आता ( काय होते असे गृहीत धरून ?) बोईंग विमान उतरविले जात असेल. पण आपल्या चुकीने किती मुलांना अनाथ व्हावे लागेल, किती बायकांना विधवा व्हावे लागेल याचा विचार करणे आपण सोडून दिले आहे. ( अहो आपण कोणा - कोणाचा विचार करायचा!)
ती धावपट्टी बोईंग सारख्या मोठ्या विमानांसाठी योग्य आहे का? हा तरी विचार केला असेल की नाही माहित नाही.

रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अपघात होऊ शकतात. असे म्हटले तर 'वाहन चालविनाराने लक्ष देऊन, खड्डा वाचवून वाहन चालवावे. स्वतः चा जीव प्यारा असेलच की त्याला.' असे ऐकायला मिळू शकते.

'अरे पोरा जरा बाईक हळू चालव की रे. समोर कोणी आल तर अपघात होईल.' असे जर एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने एखाद्या मुलाला म्हटले तर उत्तर मिळते,' ओ काका( म्हाताऱ्या) आम्ही काय ठेका घेतला आहे का लोकांना वाचवायचा. त्यांना नाही का बघून चालता येत.' असे ऐकावया मिळते.

असो आता काय निष्पन्न होईल चौकशीतून देव जाने.