Saturday, December 4, 2010

पळा पळा पळा.............

आज सकाळी आम्ही बाहेर वाकला गेलो होतो. तेव्हा चौकात पोलीस दिसले. कारण लक्षात आले नाही. घरी आल्यावर बातम्या पहिल्या तेव्हा कळले पुणे मेरेथोनला २५ वर्ष झाले आहेत. व आज मेरेथोन आहे. थोड्या वेळाने रोड वर डोकावले असता धावक धावतांना दिसले. तेव्हा खात्री झाली. ४२ किलोमीटरची मेरेथोन पुण्यात आयोजित केली होती. मी विचार केला आपण २ किलोमीटर चाललो तरी थकतो तर धावण्याचा प्रश्नच कोठे येतो. जाऊ द्या 'ये अपने बस की बात नाही.' 'जिस राह पे जाना नाही उस राह के बारे मी क्यो सोचना.'

नाही तरी हल्ली सर्व धावतच आहे. वेगवेगळ्या शर्यती लागलेल्या आहे. पूर्वी दूरदर्शन वर कुठल्यातरी कपडे धुण्याच्या पावडर ची जाहिरात होती। त्यात ती नटी म्हणायची 'भला उसकी साडी मेरी साडी से साफ कैसे?' अर्थात तिची साडी स्वच्छ असेल तर माझी साडी त्यापेक्षा स्वच्छ का नको। जगात हल्ली असेच चालले आहे बघा।

"तो माझ्यापेक्षा मोठ्या घरात कसा राहतो? मग मी त्याच्यापेक्षा मोठ्या घरात का राहू नये?"भले ते मिळविण्यासाठी मला काहीही करावे लागले तरी चालेल।

"त्याचा पगार माझ्यापेक्षा जास्त कसा"

"त्याची ....... कमाई माझ्यापेक्षा जास्त कसी"

Thursday, November 4, 2010

दिवाळीच्या शुभेच्छा


सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व हे नवीन वर्ष आपणास सुख समृद्धीचे जावो हीच इच्छा!

Friday, July 2, 2010

बर्फ बर्फ आणि बर्फ




न्यू योर्क शहरातील एका गावात बर्फाचा सण साजरा झाला होता। त्यातील काही कला कृति फनऑनदनेट या वेब साईट वर सापडल्या। त्या येथे देत आहे।

Saturday, May 22, 2010

अन-मोल जीवन


खरोखर जीवन हे अनमोल आहे. परमेश्वराने मानवाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. पण मानव जस् जशी प्रगती करीत आहे तस तशी ह्या अनमोल मानवाचे जीवन अन-मोल होत चालले आहे. आता मानवाच्या जीवन खूप स्वस्त झाले आहे. थोड्याश्या पैश्यांसाठी एक दुसऱ्याचा जीव सहजतेने घेतला जातो.

आज मेंगलोर ला विमान अपघात झाला. बिचारे १५८ प्रवाशी विनाकारण क्षणात या जगातून नाहीसे झाले. आता ब्लेक बॉक्सची (अनिष्पन्न) तपासणी होणार. ( मी येथे अनिष्पन्न शब्द सहेतुक वापरला आहे. कारण अपघात का झाला फक्त हेच आपण जनतेला माहिती व्हावे म्हणून तपास करीत असतो. म्हणजे फक्त फोर्मेलीटी हो! करणे शोधून पुढे असे होऊ नये या साठी आपण प्रयत्नच करीत नाही.)

बातम्या बघितल्या ऐकल्या आणि मला धक्काच बसला. ते विमानतळ व धावपट्टी चक्क एका डोंगरावर आहे. धावपट्टीच्या दोन्ही बाजूला चक्क दरी आहे. इतकेच नाही तर जेथे धावपट्टी संपते तेथे ही दरी होती. मला प्रश्न पडला की ज्या कोणी हे विमानतळ बांधण्यासाठी टी जागा निवडली असेल त्याने त्यावेळी असा अपघात होईल अशी कल्पना केली नसेल का? नसेल ही! कारण असा विचार करणे म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग समजले जाते. कदाचित ते विमानतळ बांधणाराने लहान विमानासाठी ते बांधले असेल. आणि आता ( काय होते असे गृहीत धरून ?) बोईंग विमान उतरविले जात असेल. पण आपल्या चुकीने किती मुलांना अनाथ व्हावे लागेल, किती बायकांना विधवा व्हावे लागेल याचा विचार करणे आपण सोडून दिले आहे. ( अहो आपण कोणा - कोणाचा विचार करायचा!)
ती धावपट्टी बोईंग सारख्या मोठ्या विमानांसाठी योग्य आहे का? हा तरी विचार केला असेल की नाही माहित नाही.

रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अपघात होऊ शकतात. असे म्हटले तर 'वाहन चालविनाराने लक्ष देऊन, खड्डा वाचवून वाहन चालवावे. स्वतः चा जीव प्यारा असेलच की त्याला.' असे ऐकायला मिळू शकते.

'अरे पोरा जरा बाईक हळू चालव की रे. समोर कोणी आल तर अपघात होईल.' असे जर एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने एखाद्या मुलाला म्हटले तर उत्तर मिळते,' ओ काका( म्हाताऱ्या) आम्ही काय ठेका घेतला आहे का लोकांना वाचवायचा. त्यांना नाही का बघून चालता येत.' असे ऐकावया मिळते.

असो आता काय निष्पन्न होईल चौकशीतून देव जाने.